सावंतवाडीकरांचा इयर एंडींग होणार गोड | 'इनरव्हील महोत्सवा'च आयोजन !

तीन वर्षांची उणीव भरण्यासाठी महिला शक्तीचा पुढाकार !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 03, 2022 18:50 PM
views 400  views

सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडीत होणारा पर्यटन महोत्सव खास आकर्षण असतो. परंतु, तब्बल तीन वर्ष सावंतवाडीकरांना महोत्सवापासून वंचित राहावं लागल. निडणूक आचारसंहिता नंतर कोरोना याला कारणीभूत ठरले. तर यंदा न.प.वर प्रशासक कारभार पाहत आहे. महोत्सव होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. मात्र, सावंतवाडीतील महिला शक्ती यासाठी पुढे सरसावली आहे. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून महिलांनी 'इनरव्हील महोत्सवाच' शिवधनुष्य उचललं आहे. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून २३, २४, २५ डिसेंबर २०२२ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान सावंतवाडी येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची घोषणा पत्रकार परिषदेत अध्यक्षा दर्शना रासम, एडिटर डॉ.सुमेधा नाईक- धुरी यांनी केली आहे. कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित होत आहे. या महोत्सवात मनोरंजनासाठी 'पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा कठपुतली शो, सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, स्टॅच स्पर्धा तसेच 'इनरव्हील क्वीन' ही स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली आहे. या महोत्सवातील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसेही आयोजित केली आहेत. त्याचप्रमाणे 'लकी ड्रॉ कुपन' हे महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असणार आहे.


इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या इनरव्हील महोत्सव २०२२ - २३ अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान गट (८ ते १४ वर्ष) ची प्राथमिक फेरी १८ डिसेंबर रोजी स. 10 ते दु. 2 या वेळेत होत आहे. अंतिम फेरी 23 डिसेंबर रोजी  सायं. ७ ते 10 या वेळेत होणार असून अधिक माहितीसाठी देवता हावळ 9307419469 यांच्याशी संपर्क साधावा. खुला गट  सोलो रेकॉर्ड डान्स 15 वर्षाच्यावरची प्राथमिक फेरी १८ डिसेंबर रोजी स. 10 ते दु. 2 या वेळेत होत आहे. अंतिम फेरी 24 डिसेंबर रोजी सायं. 6 ते 8 या वेळेत होणार असून अधिक माहितीसाठी सोनाली खोर्जुवेकर 9422076645 यांच्याशी संपर्क साधावा. ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा (१२ वर्षापुढील) खुल्या गटासाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी नाममात्र प्रवेश फी 100 रु. आकारली जाणार असून  24 डिसेंबर रोजी सायं. 7.30 ते 10 या वेळेत थेट अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेबाबत वैभवी शेवडे 9422436568 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ६ ते १२ या वयोगटासाठी 'स्टॅचू स्पर्धा' होणार आहे. यासाठी नाममात्र प्रवेश फी 50 रु. आकारली जाणार असून  25 डिसेंबर रोजी सायं. 7 वा. थेट अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेबाबत संगीता शेलटकर 9869506988 यांच्याशी संपर्क साधावा.


याच दिवशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणारी ''इनरव्हील क्वीन'' ही स्पर्धा ३० ते ५० या वयोगटातील महिलांसाठी आयोजित केली आहे. 100 रु. नाममात्र प्रवेश फी यासाठी आकारली जाणार असून  25 डिसेंबर रोजी सायं. 6 वा. थेट अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेबाबत शुभदा करमरकर 9421190388, डॉ. सुमेधा धुरी 9405813926 यांच्याशी संपर्क साधावा. सोलो डान्ससाठी अंतिम फेरीत प्रविष्ठ होणाऱ्या स्पर्धकांना ५० रु. प्रवेश फी राहील, प्राथमिक फेरीसाठी कॉसच्युम अवश्क्य नसून हि फेरी रोटरी ट्रस्ट हॉल साधले मेस समोर होणार आहे. सर्व डान्स स्पर्धेतील स्पर्धकांनी पेन ड्राईव्ह दि. १८ पर्यंत देणे आवश्यक आहे. सोलो डान्स साठी वेळ - 3 मिनिट, ग्रुप डान्ससाठी 4 मिनिट आहे. 


कोरोना काळात उद्योगधंद्यात आलेल्या मंदीनंतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील लघु उद्योजकांना स्टॉलच्या माध्यमातून व्यवसायाची एक उत्तम संधी उपलब्ध होत आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या महोत्सवाला सावंतवाडीतील, आजुबाजूच्या गावातील आणि पर्यटक मिळून हजारो लोक भेट देतील अशी अपेक्षा इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीन व्यक्त केली असून उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा यासाठी रिया रेडीज 9422076721, सोनाली खोर्जुवेकर 9422076645, शकुन म्हापसेकर 9405925702, ममता पाटणकर 9403073611 यांच्याशी संपर्क साधावा अस आवाहन करण्यात आल आहे.  'इनरव्हील महोत्सवाच' हे शिवधनुष्य महिलांनी उचललं आहे. आव्हान खूप मोठ आहे.  कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित होत आहे. कोरोनानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करत असून यात जिल्हावासियांनी सहभागी व्हावं अस आवाहन इनरव्हीलच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, आयएसओ देवता हावळ, एडिटर डॉ. सुमेधा नाईक- धुरी, डॉ. सुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी, मृणालीनी कशाळीकर यांनी केल आहे.