
सावंतवाडी : मोती तलावाच्या काठी मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ठीक ५.३० वाजता यंदाची पाडवा पहाट संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम गेली सतरा वर्ष सातत्याने सावंतवाडी नगर परिषदेच्या सौजन्याने होत आहे.
हे कार्यक्रमाचे अठरावं वर्ष असून यावर्षीची पाडवा पहाट गोव्याचे तरुण उभरते गायक कलाकार कुमार तेजस संतोष वेर्णेकर यांच्या गाण्याची मैफिल रंगणार आहे. स्वर पुरस्कार विजेते ते कलाकार आहेत. या कार्यक्रमात ते शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग गायन करणार असून त्यांची संगीतसाथ हार्मोनियम निलेश मेस्त्री तर तबला साथ किशोर सावंत करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ पुराणीक तर ध्वनी व्यवस्था परेश मुद्राळे यांची असणार आहे.पाडवा पहाट उद्घाटन सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलाने होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व प्रेक्षकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केले आहे.