वादळात कोसळलेला वटवृक्ष पुन्हा उभा राहीला

न .प .च्या कृतीचे कौतुक
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 24, 2026 19:12 PM
views 83  views

सावंतवाडी : शहरात झालेल्या वादळी वाऱ्याने जुन्या मुंबई- गोवा महामार्गालगत असलेल्या महापुरुष देवस्थान येथील रूजून आलेला वटवृक्ष कोसळला होता. यावेळी पहाणी दरम्यान प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी हे झाड न.प. च्या जागेत लावण्यासाठीच्या सुचना दिल्या होत्या. 


त्यांच्या सुचनेनुसार हा वटवृक्ष न.प.च्या कारिवडे येथील प्रकल्पावर लावण्यात आला आहे. येथे जवळपास ३०० हून अधिक झाडांची लागवड न.प.ने केली आहे. याच ठिकाणी हा वटवृक्ष उद्यान कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लावण्यात आल्याची माहिती उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांनी दिली. त्यामुळे वादळात कोसळलेल्या वटवृक्षाला नवसंजीवनी मिळाली असून सबनीसवाडा येथील नागरिकांसह पर्यावरण प्रेमींनी नगरपरिषदेच्या या कार्याचे कौतुक केले आहे.