मदर क्वीन्स स्कूलमध्ये ज्युदो - कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण

Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2026 17:24 PM
views 30  views

सावंतवाडी : सिं. जि. शि. प्र.मंडळ संचलित मदर क्वीन्स स्कूल सावंतवाडी, या प्रशालेत 20 व 21 एप्रिल 2026 रोजी ज्युदो ,कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षक दिनेश जाधव यांनी  वॉर्म अप टेकनिक,  ब्लॉक टेकनिक, सिट अप्स ,डिफेन्स टेकनिक  इत्यादीचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. तसेच स्व-संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले .त्याचप्रमाणे बॉक्सिंग या क्रीडाप्रकाराबद्दल माहिती दिली तसेच या विविध क्रीडा प्रकारात  असलेल्या व्यावसायिक संधींबद्दल देखील मार्गदर्शन केले. 

त्याचप्रमाणे शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी प्रथिनयुक्त आहार ,पालेभाज्या इत्यादींचा रोजच्या आहारात समावेश करण्याबद्दल देखील मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर यांनी विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणाची उपयुक्तता स्पष्ट केली व सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत यांच्या हस्ते प्रशालेतर्फे दिनेश जाधव यांना स्नेहभेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. श्रुती जोशी व श्रीम. प्रणिता मयेकर यांनी केले. 

या शिबीरासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर  तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.