दया पालव हिची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलं यश
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 18, 2026 16:49 PM
views 93  views

सावंतवाडी : शेतकरी कुटुंबातून आलेल्या महेंद्र अकॅडमीची विद्यार्थिनी दया पालव हिने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर  महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवत ठाणे ग्रामीण पोलीसपदी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दया पालव ही महेंद्र अकॅडमीची विद्यार्थिनी असून तिने कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील साध्या कुटुंबातून येऊन तिने स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस दलात प्रवेश मिळवला. तिच्या या यशाबद्दल महेंद्रा अकॅडमीच्या शिक्षकवर्गाकडून तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबातील मुलीने मिळवलेले हे यश इतर तरुणींना प्रेरणादायी ठरत आहे. दया पालव हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून महेंद्र अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी तीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.