बाजारपेठेतील सीसीटीव्ही बंद !

एसपींना निवेदन देऊनही दुर्लक्ष : नगरसेवक देव्या सुर्याजी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2026 15:34 PM
views 198  views

सावंतवाडी : शहरातील बाजारपेठेतील बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधूनही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही अशी नाराजी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केली. आज शहरात चोरट्यांनी भर बाजारपेठेत चोरी केलेली असताना पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असते तर तपास काम अधिक वेगाने झाले असते असे मत श्री. सुर्याजी यांनी व्यक्त केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली होती. पोलिस अधीक्षकांसह स्थानिक पोलिसांना निवेदन देत याबाबतची मागणी केली होती. मात्र, त्याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. अन्यथा, आज झालेल्या चोरीचा छडा लावताना तपास वेगाने होण्यास मदत झाली असती. खासगी दुकानदारांचे सीसीटीव्ही नसते तर परिस्थिती अधिक गंभीर असती अशी नाराजी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केली आहे.