६ एप्रिलला सावंतवाडी शहरात ९ ते ५ पर्यंत वीज पुरवठा बंद

Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2026 15:26 PM
views 108  views

सावंतवाडी : शहराला वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सोमवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण शहराचा वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. 

महावितरणने दिलेल्या पत्रकानुसार, पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी आणि वाहिनीच्या सक्षमीकरणासाठी ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या भागातील काम पूर्ण होईल, त्या भागाचा वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने तातडीने सुरू करण्यात येईल. मात्र, नागरिकांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज पुरवठा बंद राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.