
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीस वर्षांहून जास्त काळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने स्थापन केलेल्या तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या अटल प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ॲड.नकुल पार्सेकर यांची फेरनिवड करण्यात आलीय.
यावेळी अटल प्रतिष्ठान पुढील पाच वर्षांत जिल्ह्यात विविध क्षेत्रात सामाजिक कामाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करुन या जिल्ह्यातील सेवाभावी कार्यकर्त्यांच्या व प्रशासनाच्या सहकार्याने प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प केलेला असून विशेषत: पर्यावरण, करिअर मार्गदर्शन, महिलांची सुरक्षा,समुपदेशन, ग्रामीण रोजगार अशा विषयावर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन आपल्या निवडीनंतर ॲड.नकुल पार्सेकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने सावंतवाडी पोलीस स्टेशन आवारात अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्र गेल्या बारा वर्षांपासून सुरू असून आजतागायत दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातील बाराशे पेक्षा जास्त कौटुंबिक वाद मिटवण्यात प्रतिष्ठानला यश मिळाले असून अनेक विस्कटणारे संसार वाचवण्याचे काम महिला बालविकास विभागाच्या व पोलीस खात्याच्या सहकार्याने या समुपदेशन केंद्राने केले आहे.
अटल प्रतिष्ठानच्या संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आलेली असून अध्यक्षपदी ॲड.नकुल पार्सेकर ,उपाध्यक्ष डॉ.राजशेखर कार्लेकर,उपाध्यक्ष श्रीकांत राऊळ ,कार्यवाह रघुनाथ तानावडे, सहकार्यवाह- ॲड अनुराधा परब,खजिनदार श्रीमती अर्पिता वाटवे,सदस्य- विक्रम कोटणीस, प्रसाद महालेळ जितेंद्र पंडित,सौ.मानसी परब, बाळकृष्ण लिंगवत, कायम निमंत्रित डॉ.राजेश नवांगुळ,डॉ.राजेशकुमार गुप्ता, प्रशांत सावळ,सौ.सुजाता पडवळ, पुंडलिक दळवी, राजाराम पार्सेकर, सौ.सुस्मिता चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष ॲड.नकुल पार्सेकर यानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.












