
सावंतवाडी : दीपक केसरकरांना केवळ टार्गेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकरांच्याही राजीनाम्याची मागणी करावी. तसेच भोंदूबाबा अशोक खरातला ४० किलोमीटरवरून पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरेंचाही निषेध नोंदवावा असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांना हाणला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, मोर्चा काढणार, आंदोलन करणार, आमदारकीचा राजीनामा घेणार अशी वक्तव्य करणाऱ्यांपूर्वी रूपेश राऊळ यांनी मिलिंद नार्वेकरांवर बोलावं. त्यांचे सुद्धा फोटो या अशोक खरात बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने बघितले आहे. त्याच्यामुळे सर्वपक्ष मोर्चा काढताना त्यांचाही राजीनामा मागावा. तसेच पक्षाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अशोक खरात 40 किमी वरून पाणी आणून दिले. त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा निषेध रूपेश राऊळ यांनी करावा. दीपक केसरकर हे देवभक्त आहेत. आम्ही त्यांच्यावर फिरत असतो. कुठचही मंदिर दिसलं की ते तिथे थांबतात, दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं कोण काय आहे ते ? म्हणून उगाच आरोप करू नयेत. जर माहिती असताना परत कोणी जात असेल तर तो दोषी ठरतो. तेथील मंदिरात दीपक केसरकर जायचे. त्यामुळे राऊळ यांनी टीका करण्यापूर्वी आम. नार्वेकर, उद्धव ठाकरेंच बघाव, राजकारण म्हणून राजकारण करू नका असा टोला हाणला. तसेच कॉग्रेस हा जिल्ह्यात संपलेला पक्ष आहे. १६ मत पडून दोनदा डिपॉझिट जप्त झालेल्यांवर आम्ही बोलत नाही असा टोलाही त्यांनी हाणला. यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, क्लेटस फर्नांडिस, महादेव पांगम आदी उपस्थित होते.











