
सावंतवाडी : येथील मोती तलावात भलामोठा अजगर दिसून आला. सायंकाळी तलाव काठावरून जाणाऱ्यांच्या तो निदर्शनास आला. या आजाराला बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मोती तलाव व परिसरात यापूर्वी अनेकदा अजगर आढळून आले आहेत. आज सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील भागात अजगर दिसून आला. नागरिकांनीही फिरताना खबरदारी घ्यावी असंही आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.










