
सावंतवाडी : आरोंस-दांडेली येथील माऊली मतिमंद व कर्णबधिर मुलांची शाळा व वसतिगृह येथे सामाजिक बांधिलकी जपत प्रशांत माजरेकर यांनी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. समाजातील वंचित घटकांबद्दल संवेदनशीलता ठेवत त्यांनी हा वाढदिवस मतिमंद व कर्णबधिर मुलांसोबत साजरा करत त्यांना आनंदाचे क्षण दिले.
या निमित्ताने प्रशांत माजरेकर यांनी संस्थेला भेट देत तेथील मुलांसोबत संवाद साधला. मुलांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण शेअर करण्यात आले. तसेच संस्थेच्या कार्याला हातभार लागावा या उद्देशाने शाळेला रोख रक्कम स्वरूपात आर्थिक मदतही करण्यात आली. या कार्यक्रमात मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या या विशेष भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेच्यावतीने प्रशांत माजरेकर यांचे आभार मानण्यात आले. समाजाप्रती असलेली जाणीव आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केलेला हा वाढदिवस उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.










