
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात लागलेल्या आगींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचा बंब बंद असल्याने आपत्कालीन परिस्थितीत खाजगी बंबाची सोय करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात शहरात दोनवेळा व शहराबाहेर एकदा आग लागली होती. बंब नादुरुस्त असल्याने मोठी गैरसोय होऊन आगीमुळे मोठं नुकसान झालं. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थितीत गैरसोय होऊ नये म्हणून खासगी बंबाची सोय केली आहे. त्यामुळे अग्निशमन बंब दुरूस्ती होईपर्यंत पर्यायी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन दिवसांत नगरपरिषदेचा बंब दुरुस्ती होईल येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, नगरसेवक व प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.










