‘कोकणसाद LIVE’ ने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा निर्माण करावा : आमदार दीपक केसरकर

‘कोकणसाद LIVE’ चा बारावा वर्धापनदिन दिमाखात | मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Edited by: स्वप्नील परब
Published on: March 01, 2026 21:54 PM
views 60  views

सावंतवाडी : कोकणातील प्रत्येक प्रश्नावर आवाज उठविणार्‍या  ‘कोकणसाद LIVE’ने लवकरच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण करावा, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ‘कोकणसाद LIVE’च्या १२ व्या वर्धापन दिनाला त्यांनी शुभेच्छा देत कोकणच्या विकासाची दिशा स्पष्ट केली. ‘कोकणसाद LIVE’च्‍या बाराव्‍या वर्धापनदिन सोहळा सावंतवाडी येथील मांगिरीश बँक्‍वेट हॉल येथे दिमाखात पार पडला.  

या कार्यक्रमात अत्‍यंत प्रतिष्‍ठेचा ‘कोकणरत्‍न’हा सन्‍मान बांबू क्षेत्रात काम करून जगभरात बांबूचे महत्त्‍व पटवून देणार्‍या कॉनबॅकचे उद्योजक मोहन होडावडेकर यांना प्रदान करण्‍यात आला. तसेच सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘स्मार्ट लीडर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तसेच आकर्षक गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात पार पडलेल्या या कार्यक्रमाने कोकणसाद लाईव्हच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली टप्पा पार केला. मान्यवरांनी चॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, कोकणसाद लाईव्हचे संपादक संचालक संजय ढवळीकर,  ‘कोकणसाद LIVE’चे संपादक संदीप देसाई, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, उद्योजक मोहन होडावडेकर, वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य सचिन देसाई, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, Hello सिंधुदुर्गचे संपादक सागर चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री आमदार दीपक केसरकर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. यानंतर 'युवा प्रेरणा' असे स्मार्ट लीडर असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विनायक सुझुकीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र तेरसे, माजी सभापती जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, नाट्य अभिनेता दिग्दर्शक गणेश ठाकूर, वैभववाडीतील करूळ ग्रामपंचायत, उद्योजक विजय तावडे, वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य सचिन देसाई, लोरे सरपंच विलास नावळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, वाभवे-वैभववाडी न.प‌‌. सभापती रणजित तावडे, आडाळी सरपंच पराग गांवकर, सोनाळी सरपंच भिमराव भोसले, कुंब्रल पंचायत समिती सदस्य सोनिया नाईक, मणचे पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, सुपर बाजार कणकवली, देवगड तहसीलदार रमेश पवार आदींना गौरविण्यात आले.

तसेच गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक देवेंद्र कांबळे, द्वितीय क्रमांक मनोज बांदिवडेकर, तृतीय क्रमांक श्री. सावंत परिवार-वैभववाडी तसेच उत्तेजनार्थ म्हणून उमेश मांजरेकर, राजेश गवस, विठ्ठल माधव, कौस्तुभ कोयंडे, विनय सोपटे, नागेश जाधव, विष्णुप्रसाद सावंत, नंदकुमार वळंजू, संतोष साळुंखे, ओजस माडये या विजेत्यांना रोख रक्कम व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच यंदाचा कोकणरत्न पुरस्कार यशस्वी उद्योजक मोहन होडावडेकर यांना प्रदान करण्यात आला.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्‍हणाले, प्रत्येकाच्या घरगुती जीवनातील दिवस हा कोकणसाद शिवाय होत नाही. स्थानिक बातम्या व्यवस्थित ऐकायच्या असतील तर कोकणसाद शिवाय पर्याय नाही. सुरुवातीला सिंधुदुर्ग लाईव्ह या नावाने सुरु झालेला चॅनेल आता कोकणासाद नावाने नावारूपास आला. कोकणसाद या वृत्तपत्राच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आपला दबदबा निर्माण केला. कोकणचा आत्मा मुंबई आहे. कोकणातले असंख्य नगरसेवक मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कोकणसादने आपला विस्तार करावा. आजपर्यंत कोकणसादने अनेक उपक्रम हाती घेतले. अन्यायाविरोधात आवाजही उठवला. महायुती सरकारच्या माध्यमातून कोकणचा विकास होत आहे. जिल्ह्यातील तिन्ही आमदार एकाच विचाराचे आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे खूप मेहनत घेत आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत. निवडणुका संपल्यानंतर पक्ष आणि पक्षाची वस्त्र बाहेर ठेवून लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करायचं असतं आणि म्हणून ते काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडत राहील. मालवण राजकोट किल्ला येथे शिवसृष्टीसाठी निधी मंजूर झालेला आहे. आता जिल्ह्यातील आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. अधिवेशनात याबाबत आवाज उठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

कोकणसादची निर्भिड पत्रकारिता : संदेश पारकर 

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये पत्रकारिता एक आव्हान निर्माण झालेले आहे. सामाजिक बांधिलकी स्वीकारून प्रामाणिकपणे ती जोपासण्याचे काम कोकणसाद करत आहे. सत्ताधाऱ्यांवर, प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम हे तितकेच निर्भीडपणे कोकणसाद करत आहे. अनेक मोठमोठे चॅनेल दबावाखाली काम करताना दिसत आहेत. मात्र कोकणसाद लाईव्ह याला अपवाद असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी म्हटले.

खर्‍या बातम्‍या देणारे एकमेव चॅनेल : संजू परब 

खऱ्या बातम्या देणारे एकमेव चॅनेल म्हणजे कोकणसाद लाईव्ह असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केले. 

परब म्हणाले, कोकणसाद लाईव्ह नेहमीच समाजासाठी भांडत आहे. या चॅनेलने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. पत्रकारिताच नाही तर सामाजिक क्षेत्रातही हे चॅनेल अग्रेसर आहे. बातम्यांची शब्दरचना सुद्धा लोकांना भावते. सर्वच टीम जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठवतात हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

 ‘कोकणसाद LIVE’ एक नंबर : वैभव नाईक 

कोकणसाद लाईव्हने १२ वर्षात या छोट्याशा जिल्ह्यामध्ये हे चॅनेल घराघरापर्यंत या ठिकाणी पोहोचवले. आज जिल्ह्यातील अनेक नागरिक व्यवसाय, नोकरीनिमित्त मुंबई, कोल्हापूर, गोवा, पुणे यासह देशात कुठेही असले तरी कोकणसादच्या माध्यमातून त्यांना इथल्या घडामोडी समजतात. जिल्ह्यामध्ये अनेक चॅनेल आली आणि बंद सुद्धा झाली. मात्र कोकणसाद लाईव्ह हे एक नंबर राहिले असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

मान्‍यवरांकडून शुभेच्‍छांचा वर्षाव 

या सोहळ्यास टीम कोकणसादला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडीचे प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य सचिन देसाई, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, संजीव कर्पे, मोहन गवस, सदानंद नाईक, राष्ट्रवादी श.प.चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जि.प. सदस्य संदिप गावडे, प्रितेश राऊळ, नितीन मांजरेकर, डॉ. दिनेश नागवेकर, सीमा गोवेकर, कौस्तुभ पेडणेकर, कॉग्रेस तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राजन बांदेकर, देविदास आडारकर, संतोष सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, कवयित्री कल्पना बांदेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, पत्रकार रवी गावडे, संतोष वैज, संतोष गांवस, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, उमेश सावंत, भोसले नॉलेज सिटीचे नितीन सांडये, सावंतवाडीच्या सभापती तथा नगरसेविका दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, सुबोध शेलटकर, महेश नार्वेकर, भाई देऊलकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, माजी सरपंच महेश रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, उद्योजक मुद्दसर शिरगांवकर, ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार, नरेंद्र देशपांडे, सिंधु मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, गुरू मठकर, कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, मुख्याध्यापिका सौ. अर्चना सावंत, प्रसाद माधव, नगरसेवक रोहन रावराणे, शिवप्रसाद देसाई, संजय आंग्रे, तहसीलदार श्रीधर पाटील, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, समीरा खलिल, रूपा मुद्राळे, प्रा. रूपेश पाटील, विजय देसाई, विनायक देसाई, इविसन इन्फ्रास्टाचरचे डायरेक्टर अनिल वर्मा,  कसई दोडामार्ग नगरपंचायत नगरसेविका संध्या प्रसादी, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता सीमा गोवेकर, साटेली भेडशी माजी सरपंच लखू खरवत, ॲड. भुवन कुबल, अवनी परब आदींसह जिल्हाभरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.