जिल्ह्यातील प्रश्नावर आवाज उठवणारे एकमेव चॅनेल कोकणसाद लाईव्ह : अतुल रावराणे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 01, 2026 19:19 PM
views 44  views

सावंतवाडी : जिल्ह्यातील प्रश्नावर आवाज उठवणारे एकमेव चॅनेल म्हणजे कोकणसाद लाईव्ह आहे असे प्रतिपादन भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी केले. रावराणे पुढे म्हणाले, पूर्वीच सिंधुदुर्ग लाईव्ह आणि आताचे कोकणसाद लाईव्हच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. पहिल्या दिवसापासून या चॅनेलचा आलेख मी पाहिला आहे. आज शहरात पत्रकारिता करणे सोपे आहे. मात्र, ग्रामीण भागात पत्रकारिता करताना तेथील नेत्यांचा त्या भागातल्या लोकांचा कल पाहून पत्रकारिता करावी लागत आहे. अशा परिस्थितीत आज दुर्गम भागामध्ये जाऊन त्या भागातल्या अडीअडचणींना वाचा फोडण्याचा जे काम कोकणसाद लाईव्हने केले अहे.

दोडामार्ग मध्ये हत्तींनी शेतकऱ्यांचा घास पळवला. बागा उध्वस्त होत होत्या. त्यावेळी कोकणसाद लाईव्ह शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले. पर्यटनात सुद्धा कोकणसाद लाईव्हने काम करावे. केसरी गावात एक पर्यटन स्थळ उभे राहत आहे. आज जिल्ह्यात लाखो पर्यटक येत आहेत. येथील तरुणांना रोजगाराचे साधन त्यामुळे उपलब्ध झाले आहे. अजूनही त्यात भर व्हावी यासाठी कोकणसादने पर्यटन क्षेत्रात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.