कोकणसाद LIVE संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा निर्माण करेल : आमदार दीपक केसरकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 01, 2026 18:38 PM
views 40  views

सावंतवाडी : कोकणातील प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणारे कोकणसाद लाईव्ह लवकरच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण करेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. कोकणसाद लाईव्हच्या 12 व्या वर्धापन दिनाला त्यांनी शुभेच्छा देत कोकणच्या विकासाची दिशा स्पष्ट केली.  

प्रत्येकाच्या घरगुती जीवनातील दिवस हा कोकणसाद शिवाय जात नाही. स्थानिक बातम्या व्यवस्थित ऐकायच्या असतील तर कोकणसाद शिवाय पर्याय नाही. सुरुवातीला सिंधुदुर्ग लाईव्ह या नावाने सुरु झालेला चॅनेल आता कोकणासाद नावाने नावारूपास आले. कोकणसाद या वृत्तपत्राच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आपला दबदबा निर्माण केला. कोकणचा आत्मा मुंबई आहे. कोकणातले असंख्य नगरसेवक मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कोकणासादने आपला विस्तार करावा. आजपर्यंत कोकणासादने अनेक उपक्रम हाती घेतले. अन्यायाविरोधात आवाजही उठवला. 

महायुती सरकारच्या माध्यमातून कोकणचा विकास होत आहे. जिल्ह्यातील तिन्ही आमदार एकाच विचाराचे आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे खूप मेहनत घेत आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत. निवडणुका संपल्यानंतर पक्ष आणि पक्षाची वस्त्र बाहेर ठेवून लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करायचं असतं आणि म्हणून ते काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडत राहील. मालवण राजकोट किल्ला येथे शिवसृष्टीसाठी निधी मंजूर झालेला आहे. आता जिल्ह्यातील आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. अधिवेशनात याबाबत आवाज उठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.