शाडू माती पासुन गणेश मुर्ती घडविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: December 29, 2025 19:37 PM
views 33  views

सावंतवाडी : पार्वती मातेने आपल्या खळीमळी पासून विघ्नहर्ता गणरारायाची मुर्ती घडवून तीला सजीव केले ती माती कला म्हणजे जिवंत कला आहे. शाडू माती पासुन पर्यावरण पुरक गणपतीच्या मूर्त्या घडविणे या पेक्षा दुसरे पुण्याचे काम नाही. ६ ते १६ वयोगटातील मुलांच्या हातातून ही कला जोपासण्याचे काम होत आहे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मुर्तिकार संघ माजगाव यांना धन्यवाद दिले पाहिजे असे प्रतिपादन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी कुडाळ येथील मराठा समाज हाॅल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.

शाडू माती पासुन गणेश मुर्ती घडविणे ही स्पर्धा ६ ते १६ वयोगटातील मुला मुलिंसाठी कुडाळ येथील मराठा समाज हाॅल मध्ये आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी सीताराम गावडे बोलत होते.  सध्याच्या युगात लहान मुले मोबाईल मध्ये जास्त रमतात,त्या मुलांना अन्य ठिकाणी वळविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे,माती कला ही जिवंत कला आहे,हाताची दहाही बोटे एकाच वेळी काम करीत असल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते व याच सकारात्मक ऊर्जे मुळे अनेक असाध्य गोष्टी साध्य होतात, त्यामुळे गणेश मुर्तिकार संघाचे अध्यक्ष बापू सावंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक केले पाहिजे की जे गेली सहा वर्षे ही माती कला जिवंत ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबिवत आहेत.

यावेळी संघाचे अध्यक्ष बापू सावंत यांनी गेल्या सहा वर्षांतील मंडळाच्या कार्याचा आढावा घेऊन मंडळाची वाटचाल व उद्देश कथन केला, यावेळी डॉ,परब यांनीही आपले विचार मांडले.यावेळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रचे वाटप करण्यात आले तर उत्तेजनार्थ दोन व एकूण तीन अशा पाच जणांना रोख रक्कम सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५२ स्पर्धक सहभागी झाले होते.