
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. तसेच सौ. निलम राणे यांचीही भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते. यावेळी खा. राणे यांनी सौ. श्रद्धाराजे भोंसले, लखमराजे भोंसले यांच्याशी विस्तृत चर्चा केली. तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.










