माजी आमदार मठकरांच योगदान विसरून न चालणार !

विकासाचा 'रोडमॅप' तयार, सीमा मठकर यांना आशीर्वाद द्या : मिहीर मठकर
Edited by: विनायक गांवस
Published on: November 26, 2025 13:03 PM
views 140  views

सावंतवाडी : माजी आमदार जयानंद मठकर यांनी सावंतवाडीसाठी दिलेलं योगदान मोठं आहे. १९७४ साली पहिल्यांदा आमदार झाले. सामान्यातील आमदार अशी त्यांची ओळख होती. शहरातील पाणी प्रश्न गंभीर होता. यावेळी पाळणेकोंड धरणासाठी त्यांनी प्रयत्न केला. शहरात पाणी टंचाई भासत नाही याच श्रेय मठकर यांना आहे असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे यांनी व्यक्त केले. तसेच मठकर कुटूंबांच शहरविकासाठी योगदान मोठं आहे‌. विकासाचा रोड मॅप आम्ही तयार केला असून नगराध्यक्षपदासाठी सीमा मठकर यांना संधी द्यावी असे आवाहन मिहीर मठकर यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मठकर पुढे म्हणाले, माजी आमदार मठकर यांनी जिल्हा न्यायालय सावंतवाडीत आणले. विडी कामगार, नगरपालिकात कामगारांचे प्रश्न त्यांची सोडवले. स्वखर्चाने समाजोपयोगी काम त्यांनी केली. सावंतवाडी संस्थान विलीनीकरणासाठी प्रजापरिषदेच्या संग्रामात सहभाग घेतला. धान्य भाववाढ विरोधी सत्याग्रहात सहभागी झाल्याने एक महिना कारागृहवास झाला. त्यांनी केलेलं काम तेवढच महत्व आहे‌. शहर विकास करण्यासाठी अनेकांच योगदान आहे‌. त्यामुळे सीमा मठकर यांना संधी दिल्यास आम्ही डास निर्मुलन, अंडरग्राऊंड गटार योजना आदी नांदेड पॅटर्न आम्ही राबवणार आहोत. रिंगरोड प्रकल्प, मत्स्यालय निधी विनियोग, रोप-वे, पर्यटनदृष्ट्या शहर कसं सुंदर करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. शहराच्या विकासासाठीचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जयानंद मठकर यांच योगदान सावंतवाडीस ठाऊक आहे. त्यामुळे सीमा मठकर यांनाही संधी द्यावी. लोकांसाठी कार्य करणार आमचं कुटुंब आहे. गोळीबार अंगावर झेलणाऱ्या कुटुंबाचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाणार असून शहर विकासासाठी आम्हाला साथ द्यावी असं आवाहन मिहीर मठकर यांनी केल. यावेळी ज्येष्ठ नेते रमेश बोंद्रे, बाळासाहेब बोर्डेकर, सागर तळवडेकर, यश सावंत आदी उपस्थित होते.