
सावंतवाडी : सावंतवाडी : कॉग्रेसच्या माध्यमातून सौ. साक्षी वंजारी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत १७ जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी सौ. वंजारी यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवकांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीसोबत कॉग्रेस नसून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर माजी नगरसेवक सुनील पेडणेकर म्हणाले सावंतवाडी हा कॉग्रेसचा बालेकिल्ला आहे. आमचा विजय निश्चित आहे. यावेळी तौकीर शेख, शिल्पा कांबळी, बाळ नमशी, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, स्नेहल मसुरकर, सुनील पेडणेकर, निशाब शेख, ॲड. समीर वंजारी, ॲड. रितू परब, साक्षी वंजारी, अरूण भिसे, संतोष जोईल, ॲड. प्रज्ञा चौगुले, सुमेधा सावंत, शाम वाडकर, प्रणाली नाईक आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शक्तीप्रदर्शन करत कॉग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, अरूण भिसे, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, तौकीर शेख, बाळा नमशी, संजय लाड, कौस्तुभ पेडणेकर आदी कॉग्रेसचे उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










