
सावंतवाडी : सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार दीपक केसरकर यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार केसरकर यांनी सर्व नवप्रवेशितांचे पक्षात स्वागत केले.
सहकार क्षेत्रातील हे प्रमुख नेते शिवसेनेत सामील झाले त्यात अरुण गावडे (सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन),रामचंद्र जाधव (चौकुळ माजी उपसरपंच),जॉकी डिसोजा (कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक),
उल्हास राणे,विजय बंड,प्रमोद परब,ज्ञानेश परब (चेअरमन मडुरा सोसायटी),सुखाजी मोरजकर,प्रकाश मणेरकर, सुनील देसाई (खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन),महादेव परब,सुधाकर देसाई व मान्यवरांचा प्रवेश झाला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा महिला अध्यक्षा नीता कविटकर सावंत, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे व दिनेश गावडे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार दीपक केसरकर यांनी या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी, आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सहकार क्षेत्रातील चळवळ अधिक फोफावली पाहिजे, अशा पद्धतीने काम करूया, असे आवाहन नवप्रवेशितांना केले.










