
सावंतवाडी : सावंतवाडीकरांचे आशीर्वाद आम्हाला राहीले आहेत. ही प्रेमाची लढाई असून आमचा विजय निश्चित आहे. निवडणूक निवडणूकीसारखी लढू, नम्रतेन लोकांची मन जिंकू असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच आम्ही युतीची तयारी दाखवली होती. भाजपने देखील प्रस्ताव स्वीकारला नाही तर आमचा नाईलाज आहे. तरीही तिसऱ्याचा लाभ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, ताकदीन निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, युतीची बोलणी प्रत्यक्ष सुरू नाही. युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढू. आम्ही आग्रही आहोत.मात्र, भाजपकडून अद्याप निरोप आलेला नाही. त्यांनी निरोप दिला तर आम्ही बोलणी निश्चित करू, विकासाच्या मुद्यावर आम्ही लढत आहोत. विकास आम्ही केला आहे. जनता आमच्यासह राहील. आमचा उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहे. उच्चशिक्षित अशा आमच्या उमेदवार वकील संघटनेच्या अध्यक्ष आहेत. लोकांसाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या सदैव उपलब्ध असतात. यापुढे त्या लोकसेवा करतील, ॲड. निता सावंत-कविटकर विजयी होती असा विश्वास श्री केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.










