
सावंतवाडी : शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठीचे अर्ज उद्या भरले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली. आज अर्ज भरण्याची तयारी करण्यात आली होती.
मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हे अर्ज उद्या दाखल केले जाणार अशी माहिती श्री केसरकर यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. २० अधिक १ असे २१ उमेदवारी अर्ज शिवसेनेकडून दाखल करण्यात येणार आहेत.










