
सावंतवाडी : स्मार्ट मिटर संदर्भात मनसे आक्रमक झाली असून कोणाच्याही घरी जबरदस्ती स्मार्ट मिटर बसविण्यास आलेल्या कर्मच्याऱ्या बरोबर विपरित घटणा घडल्यास महावितरणचे अभियंता अधिकारी जबाबदार राहणार असा इशारा मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांनी दिलाय.
स्मार्ट मिटर संदर्भात महावितरण चे अधिकारी आणि राज्यसरकार लोकांना संभ्रमात ठेऊन करतात. स्मार्ट मिटरची सक्ती कुठचाही जुना मिटर खराब झाला त्या जागी दुसरा मिटर बसवायचा तर स्मार्ट मिटरच बसवणार अशी चालु आहे. महावितरणच्या अधीकांऱ्याची जबरदस्ती स्मार्ट मिटर बसवण्यास गेलेल्या गावपातळी वरच्या कर्मचाऱ्यास ग्राहकांच्या रोषास सामोरे जावे लागते , वरून महावितरण अधीकारी जबरदस्ती करतात आणि खाली कर्मचारी भोगतात
स्मार्ट मिटर संदर्भात विचारणा केली असता नोव्हेबर २०२५ पर्यंत जुने मिटर काढून नविन स्मार्ट मिटर बसवण्याची कमर्शीअल आॅर्डर आहे असे अभियंता राक्षे यांनी स्पष्ट केल आहे. ग्राहकांना विद्युत सेवा व्यवस्थित देता येत नाही आणि जर मनमानीने करून ग्राहकांना वेटीस धरून महावितरण काय साध्य करू पाहते या जबरदस्तीने लोकांना नाहक ञास झाल्यास मनसे तुम्हाला जशास तस उत्तर देईल असा इशारा श्री राऊळ यांनी दिला आहे.










