
सावंतवाडी : बांदा जिल्हा परिषद मतदार संघात खुले आरक्षण पडल्याने या मतदार संघातून समाजसेवक तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांच नाव आघाडीवर आहे. बांदा शहराबरोबरच ग्रामीण भागात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या तसेच सुसंस्कृत, सज्जन, निष्कलंक चेहरा असलेल्या श्री. कामत यांनाच उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांचीही इच्छा असून तशी मागणी केली जात आहे.
प्रमोद कामत यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. सर्वांशी आपुलकी वागणार असं हे नेतृत्व आहे. या मतदारसंघात त्यांचे पारडे जड दिसत आहे. जनतेशी नाळ जोडलेल्या व कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमोद कामत यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह येथील कार्यकर्तांचा आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सहकार, शिक्षण, क्रिडा क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह त्यांचे चांगले संबंध असून पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. कामत यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपचा विजय हा सुकर मानला जात आहे.










