
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने आता जोर पकडला आहे. अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ज्यात नगराध्यक्ष पदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी ४ अर्जांचा समावेश आहे.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सीमा मठकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी सीमा मठकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नगरसेवक पदासाठी समिरा खलील, शैलेश गवंडळकर, कृतिका कोरगावकर, संदीप वेंगुर्लेकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलंय. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अर्ज दाखल झालेल्या एकूण संख्येची माहिती दिली.










