
सावंतवाडी : माजी खासदार, उबाठा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सौ. सीमा मठकर यांच्यासह समर्थकांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासह आर्या सुभेदार, कृतिका कोरगावकर, नियाज शेख, तेजल कोरगावकर, आत्माराम नाटेकर आदींनी पक्षप्रवेश केला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, सुकन्या नरसुले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.










