
सावंतवाडी : वाचन संस्कृतीच्या पन्नास वर्षांच्या सोनेरी वाटचालीचा आजचा क्षण भाग्याचा आहे. या मिळालेल्या उद्घाटनाच्या मानाचा मला अभिमान आहे असं प्रतिपादन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले. सुवर्णसातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय सुवर्ण महोत्सवी बक्षीस वितरण समारंभ सातार्डा महापुरुष मंदिर सभागृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आलं. यावेळी बोलताना परब यांनी सातार्डा परिसरातील नागरिकांनी जपलेल्या वाचन संस्कृतीचे कौतुक केले. आजच्या डिजिटल युगात टिळक ग्रंथालयाच्या माध्यमातून होत असलेला वाचन संस्कृतीचा सुवर्ण महोत्सव हा खरोखरच गौरवास्पद आहे. याचे कौतुक करण्याचा मान मला या कार्यक्रमाच्या उद्घाटनातून मिळाला हे माझे खरोखरच भाग्य असून याचा मला मनापासून अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी श्री. परब यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्ता कवठणकर, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष मंगेश म्हस्के, अनंत वैदय - माजी अध्यक्ष, शर्वाणी गावकर- माजी सभापती, श्रुतिका बागकर - माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ - सावंतवाडी विधानसभा प्रमुख उबाठा शिवसेना, संदिप रावनी प्रभु - सरपंच, सातार्डा, अजित कवठणकर - सरपंच कवठणी, प्रतिक्षा मांजरेकर - सरपंच सातोसे आदी मान्यवर उपस्थित होते.










