नारायण राणेंनी पुढाकार घेतल्याने चांगलच निष्पन्न होईल : दीपक केसरकर

उद्या सर्व गोष्टी निश्चित होतील
Edited by: विनायक गांवस
Published on: November 11, 2025 13:44 PM
views 426  views

सावंतवाडी : महायुतीची बोलणी सुरू झाली ही आशादायी गोष्ट असून त्यातून चांगले निष्पन्न होईल, उद्या दुपारपर्यंत सर्व गोष्टी निश्चित होतील. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतल्याने त्यातून चांगलच निष्पन्न होईल असे मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्यासह महायुतीबाबत बैठक झाली. या बैठकीबाबत विचारलं असता केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांना युतीसह नगराध्यक्षपदाबाबत विचारलं असता ते म्हणाले, नगराध्यक्षपदासाठीची बोलणी सुरू आहे. निर्णय झाल्यानंतर त्यावर भाष्य करू असे मत व्यक्त केले. दरम्यान, कणकवली येथील बॅनरवरून शिवसेना नेत्यांचे फोटो हटवल्याबाबत विचारले असता आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, सचिन वालावलकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.