
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या महायुतीच्या भुमिकेनंतर स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. पालकमंत्री नितेश राणे येऊन गेल्यानंतर आता भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सावंतवाडीत आलेत. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी त्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे युती होणार की तुटणार ? यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.










