
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयामध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयमध्ये सहा महिन्याकरिता प्रॅक्टिससाठी आलेले डॉक्टर सुमेध दुशिंग,डॉ. शुभम बोडके,डॉ. हर्षल रायेवार,डॉ. वैष्णवी जगताप,डॉ.गोविंद अंबुरे,डॉ.स्वप्निल मुंढे,डॉ.यशवंत तोडे यांनी गेल्या सहा महिन्यापासून रुग्णांना अतिशय उत्कृष्टपणे सेवा दिली. त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यकर्त्यांना देखील मानसन्मान देऊन त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. पुढील शिक्षणासाठी ते जात असल्याने त्यांना भावी वाटचालीसाठी सामाजिक बांधिलकीकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
हे डॉक्टर पुढच्या शिक्षणासाठी जात आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व डॉक्टर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
लवकरच कॉन्ट्रॅक्टबेसवरील नवीन डॉक्टर हॉस्पिटलला उपलब्ध होणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांना दिली. याप्रसंगी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निखिल अवधूत,सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम तसेच युवा रक्ता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची प्रथमेश प्रभू,इन्चार्ज सिस्टर सुप्रिया नाईक व कर्मचारी उपस्थित होते.












