
सावंतवाडी : सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिरात आज रात्री साडेआठ वाजता गोवा येथील प्रसिद्ध गायक शुभम नाईक यांचा भजनसंध्या हा सुमधुर भजनाचा कार्यक्रम तर रात्री साडेअकरा वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
सोनुर्ली माऊली जत्रोत्सव नुकताच भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. श्रीदेवी माऊलीची तरंगकाठी आजही देवी माउली मंदिरात स्थाईक असल्याने त्या ठिकाणी दररोज विविध कार्यक्रम पार पडतात यानिमित्त आज रात्री सोनुर्ली ग्रामस्थांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सुरुवातीला सायंकाळी सात वाजता गावडेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आसोली-वडखोल ता. वेंगुर्ला बुवा कु. संकेत कुडव यांचे सुमधुर भजन होणार आहे त्याला पखवाद साथ.संचित मेस्त्री करणार आहेत त्यानंतर साडेआठ वाजता गोवा येथील प्रसिद्ध गायक शुभम नाईक यांचा भजन संध्या हा सुमधुर कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम समताच दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा वस्त्रात अडकले ब्रम्हरेत जन्मास आले शिवतेज हे नाट्यपुष्प होणार आहे तरी रसिका प्रेक्षकाने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सोनुर्ली ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.










