
सावंतवाडी : नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईड सिंधुदूर्ग सावतवाडी यांचा दृष्टिबाधीतांचा स्नेह मेळावा नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी येथील पहिल्या मजल्यावरील हॉलवर नुकताच आयोजित केला होता.
या मेळाव्यात पाहुणे म्हणून मोटर वाहन निरीक्षक रत्नकांत ढोबळ, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिधुदुर्ग व सौ. मृणालीनी कशाळीकर अध्यक्ष इनरव्हील क्लब सावंतवाडी या उपस्थित होत्या. संपूर्ण जिल्ह्यातुन या कार्यक्रमासाठी दृष्टिबाधीत उपस्थित होते. नॅबचे सचिव सोमनाथ जिगजिन्नी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नॅब अध्यक्ष अनंत उचगावकर यानी नॅब संस्थेची सुरूवाती पासुनची सविस्तर माहिती व सध्याचे नॅब नेत्र ग्णालय याची माहिती दिली दृष्टिबाधीताच्या अडीअडचणी सांगितल्या. संस्था कश्याप्रकारे मदत करते याची माहिती दिली. यावेळी सौ. रत्नप्रभा मेमन १०० टक्के अंध भागिनीला गरजे प्रमाणे वॉकर देण्यात आला. वॉकर डॉ. कश्यप देशपांडे सावंतवाडी यांनी दिला. कु. अर्पिता दळवी हिला पांढरी काठी दिली. यावेळी दोन नविन दृष्टिबाधीताची नोंद करून घेण्यात आली. उमेश लक्ष्मण पेडणेकर माजगांव सावंतवाडी व सत्तोष यशवत नाईक तुळस वेंगुर्ला यांची नोंद घेण्यात आली. मृणालीनी कशाळीकर यानी दृष्टिबाधीताना मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे रत्नाकात ढोबळे यानी दृष्टिबाधीतासाठी नॅब करत असलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले व या कर्यात आपण देखील मदत करू असे आश्वासन दिले नॅब सस्थेला शुभेच्छा दिल्या सचिव व सोमनाथ जिगजिन्नी यांनी आभार मानले.










