
सावंतवाडी : सावंतवाडी येथे युरेका आउटसोर्सिंग सोल्युशन्सच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. युरेकाचे सीओओ सौरभ सक्सेना यांच्या हस्ते फीत कापत तसेच दीपप्रज्वलन करत शुभारंभ करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून ५०० युवक युवतींना रोजगार देण्याचा मानस यावेळी व्यक्त केला गेला.
युरेका आउटसोर्सिंग सोल्युशन्सच्या माध्यमातून बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग, नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग आणि व्हाईस कॉलिंग, डेटा एन्ट्री हे काम होणार आहे. बस स्थानका शेजारील नारायण आर्केडमध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन युरेकाचे सीओओ सौरभ सक्सेना यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, ठाणे, बेंगलोर आदी ठिकाणी कंपनी कार्यरत असून आता कोकणात देखील आम्ही कार्यरत आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सीओओ सौरभ सक्सेना यांनी सांगितले.
यावेळी ओएससीड्स टेक्नॉलॉजीचे मायकल डिसोझा म्हणाले, ५० जणांना घेऊन आम्ही प्रयोग करून पाहिला. त्याला मिळालेला प्रतिसाद बघता आज आम्हाला यासाठी मान्यता मिळाली आहे. कंपनीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०० युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी युरेकाचे सीओओ सौरभ सक्सेना, हेड एच आर जयेश शेट्टीगर, ईव्हीपी सत्य प्रताप, ओएससीड्स टेक्नॉलॉजीचे मायकल डिसोझा, सुशांत पास्ते, मेलिना डिसोझा, श्रेया पास्ते, हर्षना जाधव, मानसी परब, शिवदत्त घोगळे, शैलेश टिळवे, गोपाळकृष्ण फोंडबा आदी उपस्थित होते.










