कलंबिस्त ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: November 10, 2025 14:01 PM
views 337  views

सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त गावातील तब्बल अडीचशे ग्रामस्थांनी माजी मंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.‌

रविवारी रात्री कलंबिस्त गावात हा प्रवेश पार पडला. यावेळी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख दिनेश गावडे, अजय गोंदावळे, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, अर्चित पोकळे यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ सावंत यांनी केले.