गवाणकरांना अभिप्रेत ग्रंथचळवळ पुढे नेली जाईल : मंगेश मस्के

Edited by: विनायक गांवस
Published on: November 09, 2025 19:02 PM
views 59  views

सावंतवाडी : वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना अभिप्रेत असलेली ग्रंथचळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात निश्चितपणे पुढे नेली जाईल. त्यांनी मालवणी भाषेला  सातासमुद्रापार सन्मान मिळवून दिला आहे. त्यांचे हे अजरामर कार्य निश्चितपणे पुढे नेले जाईल असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी व्यक्त केले.  

कुडाळ येथील र. बा. अनंत शिवाजी देसाई वाचनालयामध्ये जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते‌. यावेळी वस्त्रहरणकार लेखक नाटककार गंगाराम गवाणकर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री मस्के यांनी मालवणी भाषेला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम वस्त्रहरण कार यांनी केले. त्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहतील यावेळी माजी  जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी नाटककार गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषा ही किती उंचीचे आहे हे दाखवून दिले. त्यांनी वस्त्रहरणमधून मालवणीची वेगळी ओळख संपूर्ण जगाला करून दिली. त्यांचे साहित्य आणि नाट्य चळवळ मधील काम खरंच आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा उपाध्यक्ष धाकू  तानावडे, संचालक. ॲड संतोष सावंत, सतीश गावडे, प्रसाद दळवी संजय शिंदे प्रवीण भोगटे ऋतुजा केळकर आदी उपस्थित होते.