
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य १२८ ग्रंथालयांना ४० टक्के अनुदान वाढ लवकरात लवकर द्यावी, मागील बारा वर्षाचा विचार करता किमान तिप्पट अनुदान वाढ करावी नवीन ग्रंथालय मान्यता व गाव तिथे ग्रंथालय ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. वर्ग बदल आणि साधनसामुग्री अनुदान पूर्वक मिळावे कर्मचारी वेतन अनुदान शंभर टक्के शासनाकडून मिळावे सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरी भरतीत २० टक्के आरक्षण ठेवण्यात यावे अशा विविध मागण्या पूर्तता व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट १३ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.
जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने शासनाला जाग आणण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयाच्यावतीने जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. अनंत शिवाजी देसाई वाचनालयमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारणीची बैठक जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा सचिव राजन पांचाळ उपाध्यक्ष धाकू तानावडे,. संचालक ॲड संतोष सावंत ग्रंथालय मित्र पुरस्कार विजेते माझी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते संजय शिंदे प्रसाद दळवी सतीश गावडे प्रवीण भोगटे ऋतुजा केळकर आधी उपस्थित होते . या बैठकीत. विविध विषयावर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र शासनामधील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय यांना विविध मागण्या भेडसावत आहे या संदर्भात चर्चा करण्यात आली या चर्चे त महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये चार जुलै 2024 ला झालेल्या बैठकीत 40 टक्के अनुदान वाढ 2025 पूर्वी देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे परंतु अद्याप पर्यंत या संदर्भात कोणतीच कार्यवाही नाही त्यामुळे हे अनुदान तात्काळ मिळावे तसेच नवीन ग्रंथालयाला मान्यता वर्ग बदल कर्मचारी वेतन अनुदान शंभर टक्के शासनाकडून मिळावे व ते थेट ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अशा विविध मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे महाराष्ट्रभरातून ग्रंथालय चळवळीतील व ग्रंथालय अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांना येत्या 13 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधण्याचे ठरले त्यानंतर वेळ पडल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचाही नियोजन करण्यात आले आहे. ग्रंथालय अधिकारी कर्मचारी वर्गाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने वाचक स्पर्धा चे आयोजन 128 जिल्हा ग्रंथालयांमध्ये घेण्याचे ही ठरले त्या अनुषंगाने तालुका स्तरावर लवकरात लवकर वाचक स्पर्धा चे आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हास्तरीय वाचक स्पर्धा 21 नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे घेण्यात येणार आहे त्या अगोदर प्रत्येक तालुक्याने वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे असेही नियोजन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने कुडाळ येथे अनंत शिवाजी वाचनालय मध्ये ग्रंथपाल साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. आधी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन मालवण तारकर्ली येथे जानेवारी महिन्याच्या कालावधीत घेण्यात येणार आहे असेही नियोजन करण्यात आले.










