
सावंतवाडी : उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कामाची दखल घेत शासनाने पदोन्नतीने अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उपसंचालक भूमि अभिलेख, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे बढतीने नुकतीच बदली केली आहे.
प्रांताधिकारी यांनी प्रशासक म्हणून काम पाहताना गेल्या दिड वर्षात वेंगुर्ले व सावंतवाडी या नगरपालिकेवरही काम पाहिले. विकास कामे मार्गी लावण्याचे काम केले. जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी सोडविण्यासाठी भर दिला. त्यांच्या या कामाची दखल घेत राज्य शासनाने उप संचालक, भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथील अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.










