मळगाव खानोलकर वाचनालयात दिवाळी अंकांचं प्रदर्शन

वाचन प्रेमींसाठी खास दिवाळी अंक योजना सुरू
Edited by: विनायक गांवस
Published on: October 26, 2025 16:58 PM
views 13  views

सावंतवाडी : मळगाव येथील कैलासवासी उदयरामाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने वाचक सभासद व वाचन प्रेमींसाठी खास दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली आहे. या दिवाळी अंक योजनेअंतर्गत दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार 24 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रंथालयाचे व्यासंगी वाचक व माजी संचालक विजय निगुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर, कार्यवाह स्नेहा खानोलकर, सचिन धोपेश्वरकर, नितीन वराडकर, सिद्धी खानोलकर, हेमंत खानोलकर, चंद्रकांत जाधव, रितेश राऊळ, बाबली नार्वेकर, शांताराम गवंडे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालयाच्या अनोख्या दिवाळी अंक योजनेअंतर्गत नाममात्र ₹.५०/-  शुल्क भरून वाचनालयात उपलब्ध असलेले दर्जेदार दिवाळी अंक २४ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत वाचकांना घरी नेऊन वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून दिवाळी अंकातील साहित्य वाचन प्रेमीकडून वाचले जावे आणि वाचनाची प्रेरणा देखील इतरांना मिळावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. योजनेचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालया तर्फे करण्यात आले आहे.