
सावंतवाडी : येथील सर्वोदय नगर परिसरात आर्थिक फसवणूकीतून दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. परजिल्ह्यातील एक टीम व तालुक्यातील एक टीममध्ये हा वाद झाला. आर्थिक विषयातून ही घटना घडल्याचे समजते आहे. सावंतवाडी पोलिसांकडून पंचनामा सुरु असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.










