
सावंतवाडी : इन्सुलीत दाखल झालेला ओंकार हत्ती आज सकाळी अकराच्या सुमारास तेरेखोल नदी ओलांडून बांदा वाफोलीत दाखल झाला. लिंगेश्वर मंदिर धुरीवाडी येथील नदीपात्रात वनविभागच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या शिताफिने त्याला पाण्यात उतरवले.
वनविभागाचे वनपाल पुथ्वीराज प्रताप, वनरक्षक रिद्धेश तेली व निलेश मोर्ये यांनी नदीत उडी टाकून त्याला नदी ओलांडून जाण्यासाठी मार्ग दाखवीला. वनविभाग व पोलिसांच्या टीमने त्याला नदीपार करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. इन्सुलीत अंगणात आलेला हत्ती बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. अखेर वनविभाग त्याला मनुष्य वस्तीतून बाजूला करण्यास यशस्वी झालेत. मात्र, वाफोलीत गेलेला ओंकार आता बांद्यात स्थिरावतो ? की दोडामार्ग अथवा पुन्हा गोव्यात जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.










