
सावंतवाडी : भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून शहराध्यक्षा मोहीनी मडगावकर यांच्या संकल्पनेतून नगरपरिषदेच्या स्वच्छता मित्रांना दिवाळी भेट देण्यात आली. दिपावलीच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, मेघा भोगटे आदी उपस्थित होते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचारी वर्गाला ही दिवाळी भेट देण्यात आली. यासाठी आरोग्य कर्मचारी दिपक म्हापसेकर यांनी महिला भाजपचे आभार मानले.