
सावंतवाडी : जनतेच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालंय. लोकप्रतिनिधी इथल्या प्रश्नांवर बोलत नाहीत. प्रलंबित प्रश्न तसेच असून आमदार, खासदार जनतेस भेटणं मुश्कील झालंय असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी हाणला. तसेच विकासाच भिजत घोंगड पडलं असून सत्ताधाऱ्यांच्या वादात विकास बोंबलत पडलाय. युवकांच्या रोजागारबाबात कोण बोलत नाही. जाती-पातीच्या राजकारणात युवकांना अडकवले जातेय अस मत व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राऊळ म्हणाले, लोकप्रतिनिधी जातीय तेढ निर्माण करून पक्षवाढीच्या प्रयत्नात आहे. विकासकामांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असून पक्षाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहे. परंतु, जनतेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला त्यांना वेळ नाही. तु मोठा की मी मोठा ? या वादात विकास बोंबलत पडला आहे. युवकांच्या रोजागारबाबात कोण बोलत नाही. जाती-पातीच्या राजकारणात त्या युवकांना अडकवल जात आहे. एरवी यावर बोलणारे दीपक केसरकरही आज त्यावर बोलत नाही. पालकमंत्री जातीय तेढ निर्माण करत आहेत. स्वतःच पक्षातील स्थान निर्माण करताना जनतेच्या समस्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इथल्या जनतेच्या प्रश्नांनावर बोलत नाहीत. प्रलंबित प्रश्न तसेच राहीलेत. आमदार आणि खासदार यांना जनतेस भेटणं मुश्कील झालं आहे, असा टोला हाणला. यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार उपस्थित होते.










