चिताराळी बॉईज - युनिक बॉईज, सालईवाडा प्रथम

आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ' आयोजित 'नरकासुर स्पर्धा उत्साहात
Edited by: विनायक गांवस
Published on: October 20, 2025 11:21 AM
views 82  views

सावंतवाडी : आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ' आयोजित 'नरकासुर स्पर्धा  २०२५' मोठ्या उत्साहात पार पडली. खुला गट व बालगट या दोन्ही गटात अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. शेकडोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. मोठ्या गटात चिताराळी बॉईज यांनी तर लहान गटातून युनिक बॉईज, सालईवाडा यांनी प्रथम क्रमांकांचे विजेतेपद पटकावले. 

दोन गटात ही स्पर्धा पार पडली. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा प्रारंभ झाला. लहान गटात प्रथम क्रमांक युनिक बॉईज सालईवाडा यांनी प्राप्त करत १० हजार, द्वितीय बाळगोपाळ माठेवाडा यांनी ७ हजार तर तृतीय क्रमांक खासकिलवाडा बॉईज यांनी प्राप्त करत ५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. तर मोठ्या गटात चिताराळी बॉईज यांनी प्रथम क्रमांक पटकावत २५ हजारांचे बक्षीस जिंकले. द्वितीय क्रमांक माठेवाडा बालगोपाळ मित्रमंडळ यांनी १५ हजार तर दळवीवाडा युवक कला क्रीडा मंडळ माजगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावत १० हजारांच्या बक्षीसाचा मान पटकावला. माठेवाडा मित्रमंडळ व झकास मित्रमंडळ वैश्यवाडा यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सावंतवाडीतील शिवरामराजे भोसले पुतळा ते सारस्वत बँके पर्यंतच्या मार्गावर मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली. यावेळी विशाल परब, सौ. वेदीका परब, भाजपचे  जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जि. का. सदस्य सुहास गवंडळकर, तालुका अध्यक्ष बाळू देसाई, विनोद राऊळ, अजय गोंदावळे, मोहीनी मडगावकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, विशाल सावंत, हितेन नाईक, केतन आजगावकर, अमित परब आदि मान्यवर होते.