मदर क्वीन्सच्या विद्यार्थ्यांचं गणित संबोध परीक्षेत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: October 19, 2025 13:14 PM
views 83  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेत उत्तुंग यश संपादित केले. गणित संबोध परीक्षेत इयत्ता  पाचवी मधून 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  कु.अहाद बेग व कु. यश सावंत यांनी  86 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. शुभ्रा गवस हि 84  गुण मिळवून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली तर कु लक्ष्य गावडे व कु. सार्थक मुळीक यांनी 80 गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादित केला. तसेच 15 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व 4 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. इयत्ता पाचवी मधून 18 विद्यार्थी प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.तसेच इयत्ता आठवी मधून  40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  कु. करीष्मा मांजरेकर हिने 94  गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. कनिष्का मकदम ही 90 गुण पटकावून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली तर कु आयडन कार्व्हालो याने 88 गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादित केला. तसेच 24 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी,  10 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी व  6 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी संपादीत केली.इयत्ता आठवी मधून 29 विद्यार्थी प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित शिक्षिका श्रीम.प्रेरणा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित शिक्षिका श्रीम.फरजाना मुल्ला यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.