
सावंतवाडी : बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने शहरात गांधी चौक येथे वसुबारस सणाच्या निमित्ताने गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी गोपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थित कार्यकर्त्यांनी गोमाता केवळ हिंदू धर्माचा विषय नसून, ती भारतीय संस्कृती आणि कृषी क्षेत्राचे प्रतीक आहे, असा महत्त्वाचा संदेश दिला.
यावेळी विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एक ठाम भूमिका मांडताना, गोमातेची हत्या करणारा राष्ट्रद्रोही आहे, असे स्पष्टपणे नमूद केले. या पूजनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.










