लोखंडी छप्पर उडाले

वादळी वाऱ्याचा फटका
Edited by: विनायक गांवस
Published on: October 16, 2025 10:41 AM
views 146  views

सावंतवाडी : ओटवणे देऊळवाडीत दुमजली घराचे लोखंडी छप्पर उडून २५ मीटर अंतरावर कोसळले. वादळी पावसाचा फटका बसताना दिसून आला. तर याचवेळी जवळच्या घरावर वीज कोसळली. 

सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेत दोन्ही घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ओटवणे-देऊळवाडी येथे दत्तात्रय नारायण गावकर यांचे दुमजली घर असून त्याला लोखंडी छप्पर आहे. अचानक आलेल्या वादळी पावसात दत्तात्रय गावकर यांच्या दुमजली घरावरील पूर्ण लोखंडी छप्पर उडून ते काही अंतरावर कोसळले. याच वेळी लगतच्या दशरथ विष्णू गावकर यांच्या घरावर वीज कोसळली. या घटनेत दशरथ गावकर यांच्या घराच्या भिंतींना तडे जाऊन घराच्या भिंती कमकुवत बनल्या. तसेच दरवाजाचेही नुकसान झाले. संतोष महादेव गावकर यांच्या घराचे तीन पत्रे फुटून नुकसान झाले. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही. वाडीतील रामदास सोमाजी गावकर यांच्या घरावरही माड कोसळून नुकसान झाले. या वादळी पावसात ओटवणे परिसरात ठिकठिकाणी झाडे कोसळून नुकसानी झाली.