नगराध्यक्षपदासाठी दोन सक्षम उमेदवार

राष्ट्रवादीच्या उदय भोसले यांचा दावा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 14, 2025 12:53 PM
views 37  views

सावंतवाडी : येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने आमची बैठक झाली. महायुतीत सन्मानजनक उमेदवार न मिळाल्यास आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार देखील केला आहे. नगराध्यक्षपदासाठी दोन सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढावी लागली तरी मागे हटणार नाही. सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी दोन महिला उमेदवार आमच्यासमोर आहेत. विचारात घेतलं तर सहकार्य मिळेल. समन्वयक न झाल्यास आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. भोसले यांनी दिला. यावेळी पक्षाचे नेते उमाकांत वारंग, सुरेश गवस, शफीक खान, हर्षवर्धन धारणकर, अगस्तीन फर्नांडिस, एम.डी. सावंत, अस्लम खतिब, संदीप पेडणेकर, साबाजी सावंत, रिद्धी परब, धारीणी देसाई, मेघेंद्र देसाई, विलास पावसकर, विजय कदम, रोहन परब, शिवाजी जंगले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.