सावंतवाडीत आज रंगणार कोजागिरी कवी संमेलन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 14, 2025 10:56 AM
views 15  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी कवी संमेलन २०२५ ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक डॉ. शरयू आसोलकर यांया अध्यक्षतेखाली मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी आयोजित केले आहे. श्रीराम वाचन मंदिरच्या कविवर्य केशवसुत सभागृहात सायंकाळी ६.३०  वाजता होणाऱ्या  या संमेलनासाठी कवयित्री डॉ. सई लळीत, साहित्य अकादमी प्राप्त ज्येष्ठ कवी, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून प्रभाकर भागवत, दादा मडकईकर, उषा परब, डॉ. अनिल धाकू कांबळी, संध्या तांबे, वीरधवल परब, विठ्ठल कदम, रुजारिओ पिंटो, अजय कांडर, कल्पना मलये, कल्पना बांदेकर, नामदेव गवळी, अनिल जाधव, किशोर कदम, मोहन कुंभार, डॉ. गोविंद काजरेकर, मधुकर मातोंडकर, राजेश कदम, दीपक पटेकर, श्वेतल परब, सरिता पवार, नीलिमा यादव, शालिनी मोहळ, हर्षवर्धिनी जाधव, मंजिरी मुंडले, अंकुश कदम, सिद्धार्थ तांबे, मृण्मयी बांदेकर, आर्या बागवे, अरुण नाईक, रमेश सावंत, स्नेहा कदम, सफर अली व अन्य कवींचा सहभाग राहणार आहे.

संमेलनात सहभागी कवींपैकी एक कवीच्या उत्कृष्ट कवितेला कवी वसंत सावंत सन्मान दिला जाणार आहे. या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी, कार्याध्यक्ष विठ्ठल कदम, कार्यवाह मनोहर परब यांनी केले आहे.