
सावंतवाडी : राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ, सावंतवाडी व वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा २०२५ च आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. शिवरायांनी दऱ्याखोऱ्यांत वसणाऱ्या असंख्य मावळ्यांना संघटित करून आणि अभेद्य असे गड, किल्ले,दुर्ग उभारुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या रयतेच्या राजाने निर्माण केलेल्या अभेद्य अशा किल्ल्यांमधून आपणास शौर्य, संघटन, आत्मविश्वास व स्वराज्याचे धडे मिळतात. या महान परंपरेचे मुलांना स्मरण करून देणे. त्यांना शिवरायांच्या जाज्वल्यमयी शौर्याचा व तेजस्वी इतिहासाचा परिचय करून देणे आणि त्यांच्यामध्ये संस्काराचे बीजारोपण करणे. तसेच आपला अमूल्य असा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणे, संवर्धन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचे आज आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्याच्या जाणीवेतून ही किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेची उदिष्टे मुलांमध्ये सृजनशीलता आणि ऐतिहासिक जाण वाढवणे, शिवकालीन वारशाचे संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण करणे.सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, किल्ल्यांच्या माध्यमातून मुलांना इतिहासाचा परिचय करून देणे आणि संस्काराची जोपासना करणे. अंगभूत कला कौशल्य व सांघिक भावना व कल्पकतेचा विकास करणे व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यास प्रवृत्त करणे, संदर्भ साहित्य अभ्यासून अभिव्यक्त होण्यास शिकणे आहे. स्पर्धेचे नियम सहभागी स्पर्धकांनी किल्ला स्वतः तयार केलेला असावा, किल्ला बांधणी कामात किमान पाच स्पर्धकांचा प्रत्यक्ष सहभाग असावा, किल्ला बांधणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य पर्यावरण पूरक असावे. किल्ल्याची ऐतिहासिक रचना शक्य तितकी वास्तवाशी जुळणारी असावी व परीक्षण समितीचा निकाल अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल. तसेच सहभागी गटातील स्पर्धकांपैकी किमान एका स्पर्धकांने किल्ल्याविषयी माहिती सांगणे बंधनकारक असणार आहे. नोंदणी अंतिम तारीख मंगळवार, २८ ऑक्टोंबर,२०२५ असून परीक्षण तारीख:
गुरुवार, ३० ऑक्टोंबर, २०२५ राहील. बक्षीस वितरण तारीख
रविवार,०९ ऑक्टोंबर२०२५ रोजी होणार असून बक्षिसे
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके, चषक व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील. यासाठी संपर्क श्री प्रथमेश आठलेकर ७२१८२२५३५९, किशोर चिटणीस ९४२१०७३३८३, अँड. ऋग्वेद सावंत ९४२००६४५०६ यांना करण्याचे आवाहन केलं आहे.










