
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीनंतर मोठा संघर्ष आम्हाला सोसावा लागला. यानंतर आज आमची बैठक झाली. यात सावंतवाडी मतदारसंघातून तिन्ही तालुक्यात निवडणूका लढण्यासाठी आम्ही तयारीत आहोत. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सज्ज आहोत. वेळ पडल्यास स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल, स्थानिक पातळीवर देखील चर्चा केली जाईल असं श्री. सामंत म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी कोणावरही कारवाई झालेली नाही. अर्चना घारे-परब देखील पक्षातच आहेत. आज प्रदेशच्या बैठकीस देखील ते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला तालुकाध्यक्ष दिपीका राणे,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, सुदेश तुळसकर, रवीकिरण गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस शहराध्यक्ष देवा टेमकर सुदेश तुळसकर वजारात उपसरपंच दीपिका राणे युवक शहराध्यक्ष नईम मेमन बावतीस फर्नांडिस इफ्तिकार राजगुरू प्रकाश म्हाडगुत उल्हास नाईक गौतम महाले साईप्रसाद केरकर आनंद तुळसकर रजाक खान एंजल नाईक आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.










